Friday, June 21, 2024
Homeमनोरंजनआमिर आंघोळ टाळण्यासाठी बनवत होता बहाणे!!

आमिर आंघोळ टाळण्यासाठी बनवत होता बहाणे!!

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान प्रत्येक काम अतिशय परफेक्ट करतो. आमिरचा प्रत्येक सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरतो, कदाचित यामागे हेच कारण आहे. आमिरच्या अलीकडे आलेल्या काही चित्रपटांनी बॉक्सऑफिसवर धमाका केला आहे. त्याचा लास्ट रिलीज चित्रपट म्हणजे, ‘दंगल’. या चित्रपटाने बॉक्सऑफिसवरचे कमाईचे अनेक रेकॉर्ड ध्वस्त केलेत. पण या चित्रपटासाठी वजन वाढवताना अन् हे वाढलेले वजन कमी करताना आमिर काय करायचा माहितीयं? तर जिममध्ये घाणेरड्या शिव्या द्यायचा.

होय, बॉलिवूडचा हा ‘रणछोडदास चांचड’ शिव्यांसाठी चांगलाच प्रसिद्ध आहे. अर्थात आत्तापर्यंत हे कुणालाही ठाऊक नव्हते. केवळ त्यांच्यासोबतच्या जवळच्या व्यक्तींनाचं तेवढे हे ठाऊक होते. पण आता ‘दंगल’चे दिग्दर्शक नीतेश तिवारी यांनीच आमिरची पोलखोल केली आहे. एका टीव्ही चॅनेलवरील दिवाळी स्पेशल शेमध्ये आमिर खान व क्रिकेकपटू विराट कोहली पहिल्यांदा एकत्र दिसले. या दोघांचे अनेक सीक्रेट या शोमधून जगासमोर आलेत.

आमिरने ‘दंगल’साठी प्रचंड वजन वाढवले होते आणि पुन्हा काही सीन्ससाठी हे वाढवलेले वजन त्याला  कमी करावे लागले होते. याबद्दलचे एक सीक्रेट नीतेश तिवारी यांनी उघड केले. आमिर जिममध्ये असतो तेव्हा वजन उचलताना प्रचंड शिव्या देतो. जसे जसे वजन वाढते तशा तशा त्याच्या शिव्या सुद्धा वाढतात. ‘दंगल’वेळी हेच घडले, असे नीतेश तिवारी यांनी सांगितले.  आमिरसोबत या चित्रपटात काम करून चुकलेली जायरा वसीम हिनेही आमिरचे एक सीक्रेट उघड केले. आमिरला आंघोळ  करायला अजिबात आवडत नाही. आंघोळ टाळण्यासाठी तो वेगवेगळे बहाणे बनवतो. सोबतच त्याला प्रचंड गर्मी होते. त्यामुळे त्याचा एसी अतिशय कमी टेम्परेचरवर असतो. त्याच्या आजुबाजूला असलेले लोक थंडीचे गारठत असतात आणि आमिर मस्तपैकी मजेत असतो. नॅशनल टीव्हीवर असे सीक्रेट ओपन होत असलेले पाहून आमिर काही क्षण वरमला. पण त्याच्यासोबत असलेल्या विराटला मात्र यावर हसू आवरणे कठीण झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments