Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमनोरंजन‘सैराट’ रिमेकच्या ‘धडक’ हिंदी चित्रपटच्या शूटिंगला सुरुवात

‘सैराट’ रिमेकच्या ‘धडक’ हिंदी चित्रपटच्या शूटिंगला सुरुवात

श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टर धडकया सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. जान्हवी आणि इशानने आजपासून या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली.

आज सकाळी चित्रपटाचा पहिला शॉट चित्रीत झाला. या पहिल्या शॉटचे फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये इशान आणि जान्हवी समुद्रकिनारी बसलेले दिसत असून त्यांच्या हातात ‘धडक’चा बोर्डही आहे.

करण जोहर निर्मित ‘धडक’ सिनेमाचं दिग्दर्शन शशांक खेतान करत आहे. ‘धडक’ हा नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. यात जान्हवी कपूर आर्ची तर इशान खट्टर परशाची भूमिका साकारणार आहे. ‘सैराट’ चित्रपटाची कथा महाराष्ट्रात घडली होती, मात्र ‘धडक’ची कहाणी राजस्थानात घडताना दिसणार आहे.

आर्चीच्या आईची व्यक्तिरेखा जान्हवीची रिअल लाईफ आई म्हणजेच श्रीदेवी साकारण्याची शक्यता आहे. श्रीदेवी यांना सिनेमाची ऑफर देण्यात आली असून त्यांनी अद्याप आपलं उत्तर दिलेलं नाही. मात्र मुलीचं पदार्पण असल्यामुळे त्या ही ऑफर नाकारण्याची शक्यता कमी आहे.

हा चित्रपट ६ जुलै, २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments