Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमनोरंजनसलमान करणार मानुषीला बॉलिवूडमध्ये लाँच

सलमान करणार मानुषीला बॉलिवूडमध्ये लाँच

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला सिनेमात कास्ट करण्यासाठी बॉलिवूडच्या अनेक निर्मात्यांची धडपड सुरू आहे. बॉलिवूडचा दबंग खान सलमाननेही मानुषीसोबत सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केली .सलमानचा मेव्हणा आयुष शर्माला बॉलिवूडमध्ये लाँच करायचे. त्यासाठी त्याला फ्रेश चेहरा हवाय. आणि मानुषी चांगला चॉइस असल्याचं त्याचं म्हणणं आहे.

सलमान नेहमीच बॉलिवूडमध्ये नवा चेहरा लाँच करत असतो. त्यामुळेच त्याला मानुषीलाही त्याच्या सिनेमात कास्ट करण्याची इच्छा आहे. मात्र मानुषीने तिला आमिर खानसोबत काम करण्याची इच्छा असल्याचं म्हटलंय. त्यामुळेच मानुषी आता नक्की कोणत्या स्टारसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करते ते पाहणं औत्सुक्याचं ठरणारे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments