Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeदेशकाँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याच्या प्रकियेला प्रारंभ

काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याच्या प्रकियेला प्रारंभ

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार आहे. अध्यपदाच्या निवडीसाठी आज अधिसूचना जारी केली जाईल. तसंच इच्छूक आज पासून आपला उमेदवारी अर्ज भरु शकतात. मात्र ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख ४ डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. तर ५ डिसेंबरला अर्जांची छाननी करुन दुपारी ३.३० वाजेपर्यंत वैध अर्जांची यादी जाहीर करण्यात येईल. मात्र पक्षाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी एकमेव उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे याच दिवशी म्हणजेच ५ डिसेंबरला राहुल गांधींची काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून घोषणा होऊ शकते. अशाप्रकारे ९ आणि १४ डिसेंबरला दोन टप्प्यात होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीआधी राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष बनण्याची शक्यता आहे.

मात्र काँग्रेसच्या निवडणूक कार्यक्रमानुसार, पक्षाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ११ डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजेपर्यंत अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. आवश्यक असल्यास १६ डिसेंबरला मतदानही होईल. जर मतदान झालं तर मतमोजणीनंतर १९ डिसेंबर रोजी निकालाची घोषणा होईल.

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूकीची प्रक्रिया पुढील प्रमाणे..

अर्ज भरण्याची तारीख – ४ डिसेंबर

अर्जांची छाननी – ५ डिसेंबर

अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – ११ डिसेंबर

मतदानाची तारीख (गरज असल्यास) – १६ डिसेंबर

मतदानाचा निकाल – १९ डिसेंबर

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments