Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमनोरंजनमंदिरा बेदीने साडी आणि हाय- हिल्समध्ये मारले पुश-अप्स

मंदिरा बेदीने साडी आणि हाय- हिल्समध्ये मारले पुश-अप्स

फिटनेस आयडॉल झालेली अभिनेत्री मंदिरा बेदीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मंदिरा साडी नेसून पुश- अप्स मारताना दिसत आहे. एका कार्यक्रमात पाहुणी म्हणून गेलेल्या मंदिराला कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाने पुश-अप्स मारण्याचे आव्हान दिले. दुसरी एखादी अभिनेत्री असती तर साडी नेसली म्हणून पुश- अप्स मारायला तात्काळ नकार दिला. मंदिराने मात्र तसे केले नाही. तिने क्षणाचाही विलंब न करता पुश- अप्स मारायला सुरूवातही केली. फिटनेस फ्रिक म्हणून ओळखली जाणारी मंदिरा साडीतही त्याच शिताफीने पुश- अप्स मारताना दिसली. यावरुनच कोणतीही गोष्ट करण्यासाठी बाह्य गोष्टींपेक्षा इच्छा शक्ती दांडगी हवी हेच तिने दाखवून दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments