Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेदोन महिन्यांपूर्वीच विवाह केलेल्या तरुणाची आत्महत्या

दोन महिन्यांपूर्वीच विवाह केलेल्या तरुणाची आत्महत्या

 

पिंपरी-चिंचवड: पत्नीशी भांडण झाल्याने निगडी येथे नवविवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. श्रावण गोरख कुसाळकर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत श्रावण कुसाळकर (वय-२६, रा. राहुल नगर, ओटा स्कीम, निगडी) याचे पत्नी नीता कुसाळकर बरोबर रविवारी रात्री जोरात भांडण झाले होते. श्रावण हा दारू पिऊन आला होता. दारूच्या नशेत त्याने पत्नी नीताला मारहाण करून शिवीगाळ केली होती. हे भांडण ऐकून खालच्या मजल्यावर राहणारी नीताची बहीण वर आली आणि तिने नीताला तिच्या घरी घेऊन गेली. मात्र याच भांडणाचा राग मनात धरूण श्रावणने पहाटे पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सकाळी उघडकीस आली. मृत श्रावण आणि नीताचे दोन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments