Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमनोरंजनदिलीप कुमार यांचे वागणे पाहून सेटवरून निघून गेली होती ‘ही’ अभिनेत्री!

दिलीप कुमार यांचे वागणे पाहून सेटवरून निघून गेली होती ‘ही’ अभिनेत्री!

ट्रॅजेडी किंगदिलीप कुमार यांचा आज (११ डिसेंबर) ९५ वा वाढदिवस. १९४४ मध्ये ज्वार भाटाया चित्रपटापासून आपल्या करिअरची सुरूवात करणा-या दिलीप कुमार यांचे खरे नाव युसूफ खान. आपल्या काळात दिलीप कुमार रोमान्सचे बादशाह होते. देवदासया चित्रपटात त्यांनी याचे दर्शन घडवले होते. दिलीप कुमार यांनी आपल्या करिअरमध्ये फार कमी चित्रपट केलेत. मात्र या मोजक्या चित्रपटांनी त्यांना सुपरस्टार बनवले.

दिलीप कुमार यांच्या वाढदिवशी त्यांच्याबद्दल आम्ही तुम्हाला एक खास किस्सा ऐकवणार आहोत. दिलीप कुमार  एका अभिनेत्रीसोबत असे काही वागले की, त्यांना आजही आपल्या या वागण्याचा पश्चाताप होतो. ही अभिनेत्री कोण तर सुरैय्या. सुरैय्याच्या करिअरला त्याकाळात अवकळा आली होती. एकेदिवशी दिलीप कुमार यांनी दिग्दर्शक आसिफ यांच्याकडे सुरैय्याच्या नावाची शिफारस केली. सुरैय्याला आपल्या चित्रपटात घेण्यामागे दिलीप कुमार यांचा काय हेतू होता, माहित नाही. पण आसिफ यांनी दिलीप कुमार यांचे ऐकले आणि लगेच दिलीप कुमार व सुरैय्या यांच्या‘जानवर’ या चित्रपटाची घोषणा केली. चित्रपटाचे शूटींग सुरू झाले. पहिल्याच सीनमध्ये सुरैय्या व दिलीप यांच्यात साप चावल्याचा एक सीन होता. सुरैय्याच्या पायाला साप चावतो आणि दिलीप कुमार तोंडाने ओढून हे विष काढतो, असा हा सीन होतो. खरे तर पहिल्याच दिवशी सीन आरामात शूट झाला. पण तरिही हा सीन सलग चार दिवस वारंवार शूट होत राहिला. हा सीन रोज तसाच शूट व्हायचा आणि यानिमित्ताने  दिलीप कुमार यांना सुरैय्याच्या पायाचे चुंबन घ्यायची संधी मिळायची. पण एकदिवस दिलीप कुमार यांचा हेतू ठीक नसल्याचे सुरैय्याला कळून चुकले.

दिलीप कुमार आणि दिग्दर्शक यांच्यात काहीतरी शिजत असल्याचे तिला समजले आणि यानंतर जे झाले ते सगळ्यांच्याच कल्पनेपलिकडचे होते. सुरैय्याने घरी गेल्यानंतर आपल्या आजीला  सगळे सांगितले. यानंतर दुस-या दिवशी पुन्हा तोच सीन शूटसाठी घेतला गेला आणि सुरैय्याचा राग अनावर झाला. ती उठली अन् तडक सेटवरून निघती झाली. सुरैय्याने चित्रपट सोडल्यानंतर आसिफ यांनी शूटींग थांबवले. पुढे हा चित्रपट थंडबस्त्यात पडला. यानंतर दिलीप कुमार व सुरैय्या यांनी कधीच एकत्र काम केले नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments