Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeविदर्भनागपूरविरोधकांच्या गोंधळानंतर विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

विरोधकांच्या गोंधळानंतर विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

नागपूर – कर्जमाफीबाबत बँकेत चौकशी केल्यावर शेतकऱ्यांची फक्त नावे आली आहेत., मात्र अजूनही पैसे जमा झालेले नाहीत. शेतकऱ्याला बँकेच्या वसुलीचे पत्र येत आहेत, कोणत्या खात्यावर कोट्यवधी रुपये गेले, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना विविध प्रश्नावरुन जाब विचारल्याने चांगलाच गदारोळ झाला. गदारोळामुळे दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.

धनंजय मुंडे यांच्या भाषणातील मुद्दे – 
– विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कर्जमाफी, बोंड अळीमुळे झालेले नुकसान यावर विधानपरिषदेत स्थगन प्रस्ताव सादर करण्यात आला.
– सहा महिने झाले घोषणा होऊन, कुठे आहे कर्जमाफी – धनंजय मुंडे
– यवतमाळ ते नागपूर एकही कर्जमाफी झालेला शेतकरी भेटला नाही – मुंडे
– शेतकऱ्यांना बँकेच्या वसुलीची पत्रे येत आहेत, कोणत्या खात्यावर करोडो रुपये गेले
– मुख्यमंत्री साहेबांनी मुक्काम केलेल्या शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही.
– कर्जमाफी म्हणजे मुख्यमंत्र्यांची नोटंकी केली आहे.
-बोंड अळीमुळे शेतकरी उद्धवस्त झाला आहे.
– शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करू देण्याची परिषदेत विरोधकांच्या मागणीचा प्रस्ताव, मात्र हा प्रस्ताव सभापतींनी फेटाळला.
– कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले होते.
– ही तर भाजप सेनेची बोंड अळी
– विधानपरिषदेत विरोधकांची जोरदार घोषणा बाजी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments