Placeholder canvas
Tuesday, May 7, 2024
Homeमनोरंजनजॅकलिनने टायगरसोबत काम करण्यास का दिला नकार?

जॅकलिनने टायगरसोबत काम करण्यास का दिला नकार?

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने फार कमी वेळात चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. खरंतर तिच्या अभिनय कौशल्यापेक्षा तिच्या लूकसाठीच ती फार प्रसिद्ध आहे. त्यासाठीच तिचा एक मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. मात्र, जॅकलिन स्वत: भूमिका किंवा सहकलाकार निवडताना फार सतर्क असल्याचं दिसून येतं. अभिनेता टायगर श्रॉफसोबत तिचा ए फ्लाईंग जटहा चित्रपट बॉक्स ऑफीसवर दणक्यात आपटल्यानंतर तिने टायगरसोबत दुसऱ्या चित्रपटात भूमिका साकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

‘डेक्कन क्रॉनिकल’ने दिलेल्या वृत्तानुसार, जॅकलिनने याआधी दिग्दर्शक साजिद खानसोबतही तसेच केले आहे. साजिदचे ‘हाऊसफुल्ल’ आणि ‘हाऊसफुल्ल २’ हे दोन चित्रपट यशस्वी ठरले. पण जेव्हा ‘हमशकल्स’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर फ्लॉप ठरला, तेव्हा जॅकलिनने त्याच्या चित्रपटांमध्ये काम करण्यास नकार दिला.

दुसऱ्या बाजूस जॅकलिन तिच्या आगामी ‘रेस ३’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असल्याचं सूत्रांकडून कळत आहे. अशा वेळी एकीकडे सलमान खानसोबतचा चित्रपट आणि दुसरीकडे टायगर श्रॉफची ऑफर असताना जॅकलिनने ‘रेस ३’ला पसंती देणे साहजिक असल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे. आता यामागचं नेमकं कारण जॅकलिन स्वत:च सांगू शकेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments