Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादजालन्यात तरुणाचा जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ!

जालन्यात तरुणाचा जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ!

बीड- जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात रविवारी मध्यरात्रीनंतर भररस्त्यात एका तरुणाची जिवंत जाळून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मृत तरुण बीड जिल्ह्यातील समनापूर (ता. बीड) येथील रहिवासी आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

अनंत इंगोले असे मृत तरुणाचे नाव आहे. अंबड रोडवरील कुरण फाट्याजवळ ही घटना घडली. सोमवारी पहाटे त्याचा जळालेला मृतदेह आढळल्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पहाटे पंचनामा केला. या घटनेत मृतदेह जळून खाक झाला आहे. मृतदेहा शेजारी पोलिसांना आधारकार्ड आढळले. त्यावरुन मृतदेहाची ओळख पटली. ही हत्या कोणी केली? कशामुळे केली? याचे कारण गुलदस्त्यात आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments