महत्वाचे…
.अभिनेत्यांनी राजकारणात येऊ नये असा दिला मंत्र २.रजनीकांत,कमल हसन यांच्या प्रवेश चर्चेमुळे केले व्यक्त ३. यापूर्वी गौरी लंकेश च्या हत्येप्रकरणी सरकारवर टीका केली
बंगळुरू : अभिनेत्यांनी राजकारणात येऊ नये. त्यांच्या चाहत्यांप्रती त्यांच्या काही जबाबदाऱ्या आहेत. हे त्यांना कळायला हवं. अभिनेत्यांनी राजकारणात येणं देशासाठी एकप्रकारची आपत्तीच असेल, असं स्पष्ट मत अभिनेते प्रकाश राज यांनी व्यक्त केलं.
बंगळुरू मीडियाशी संवाद साधताना प्रकाश राज यांनी हे मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी आपण राजकारणात येणार नसून कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचंही स्पष्ट केलं. विशेष म्हणजे दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हसन राजकारणात येणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर प्रकाश राज यांनी केलेलं वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे.
राष्ट्रगीतावरही भाष्य
प्रकाश राज यांनी यावेळी चित्रपटगृहात गाणं वाजवण्याच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. चित्रपटगृहात राष्ट्रगीतासाठी उभं राहून देशभक्तीचा पुरावा देण्याची गरज आहे, असं मला वाटत नाही, असंही त्यांनी सांगितलं. प्रकाश राज यांनी यापूर्वीही पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली होती. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच विविध मुद्द्यांवर संवाद मीडियाशी संवाद साधला.