महत्वाचे…
1. पद्मावती चित्रपट १ डिसेंबरला होणार प्रदर्शित २. देशभरात चित्रपटाविरुध्द विरोध कायम ३. चित्रपटावरुन गोंधळ चिघळण्याची शक्यता ४.चित्रपट प्रदर्शनापुरवी राजपुताना संघटनेला हा चित्रपट दाखवावा
मुंबई-संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती या चित्रपटात होणार विरोध कायम असून मुंबईत अखंड राजपूताना सेवा संघाने त्याविरोधात निदर्शने केली आहे. १३ आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
राजस्थानमधील राजपूत संघटनांनी १७ नोव्हेंबरला चित्तोड किल्ला बंद करण्याची धमकी दिली आहे. सूरतमध्येही राजपूत समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि करणी सेनेने मोर्चा काढला. जयपूर राजघराण्याच्या राजकुमारी दिया यांनी या चित्रपटाविरोधात स्वाक्षरी मोहीम राबवली आहे. या चित्रपट १ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.
जयपूर राजघराण्याचा विरोध
– जयपूर राजघराण्याची राजकुमारी दिया कुमारी यांनी शनिवारी गोविंद देवजी मंदिराच्या प्रवेशद्वारावर स्वाक्षरी मोहिम सुरु केली. या दरम्यान राजकुमारी दिया म्हणाली की, या मोहिमेत जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे यासाठी ही मोहिम सर्वत्र राबवण्यात येईल. हा चित्रपट इतिहासकारांना दाखविण्यात यावा.