skip to content
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रशाहरुखच्या बंगल्याला आयकर विभागाने ठोकले टाळे

शाहरुखच्या बंगल्याला आयकर विभागाने ठोकले टाळे

मुंबई: अभिनेता शाहरुख खान याच्या बंगल्याला आयकर विभागाने टाळे ठोकले आहे. मात्र हा बंगला मुंबईतला मन्नत नाही तर अलिबाग येथील आहे. शेतीसाठी विकत घेतलेल्या जमिनीवर शाहरुखने त्याचा आलिशान बंगला उभारला आहे. १९ हजार ९६० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर हा बंगला बांधण्यात आला आहे. यासंदर्भात शाहरुखला आयकर विभागाने नोटीस पाठवली होती. ९० दिवसांच्या आत उत्तर न दिल्यास मालमत्ता जप्त होते. हाच नियम पुढे करत अलिबाग येथील बंगल्याला टाळे लावण्याची कारवाई करण्यात आली आहे.

‘बिझनेस स्टँडर्ड’ने दिलेल्या बातमीनुसार शाहरुखचा हा बंगला म्हणजे १४६.७ कोटींची ही मालमत्ता असून त्याचे बाजारमूल्य पाच पटीने वाढण्याची शक्यता आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. पाच बंगल्यांना जेवढी जागा लागते तेवढ्या जागेत शाहरुखचा हा एक बंगला उभा राहिला आहे. या बंगल्यात त्याचे हेलिपॅड आणि स्विमिंग पुलही आहे.

शाहरुखने मोठा बंगला बांधण्यासाठी तो शेतकरी असल्याचे दाखवून जमीन विकत घेतल्याचाही त्याच्यावर आरोप करण्यात आला आहे. या वृत्तानुसार, शाहरुखने २००५-०६ देजा वू कंपनीला ८.४ कोटी रुपयांचे असुरक्षित कर्ज दिले होते. या संपूर्ण प्रकरणावर शाहरुखने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments