Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री आयुक्तांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत- संजय निरुपम

मुख्यमंत्री आयुक्तांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत- संजय निरुपम

मुंबई : कमला मिलमधल्या अग्नितांडवावरचे आरोप-प्रत्यारोप अजूनही चालू आहेत. आता पुन्हा एकदा संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय, गेल्या २० दिवसांत मुंबईमध्ये आगीमुळे ३१ लोकांना जीव गमवावा लागला. मुंबई आगीच्या विळख्यात सापडली आहे. महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे आणखी दुर्घटना होण्याची भीती आहे. पण मुख्यमंत्री मात्र आयुक्तांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत.

काही दिवसांपूर्वी कमला मिल आग दुर्घटनेनंतर दोषी हॉटेलमालकाविरोधातली कारवाई थांबवण्यासाठी एका नेत्यानेच फोन करून दबाव आणल्याचा खळबळजनक आरोप बीएमसीचे आयुक्त अजॉय मेहता यांनी केलाय. विशेष म्हणजे पालिका सभागृहातच त्यांनी हा गंभीर आरोप केल्याने कमला मिल आग दुर्घटनेचं गांभीर्य आणखीनच वाढलंय. अर्थात आयुक्तांनी या नेत्याचं नाव घेणं टाळलं असलं तरी हॉटेलमालकावरील कारवाई थांबवण्यासाठी थेट पालिका आयुक्तांवर दबाव टाकणारा ‘तो’ नेता कोण ? याचीच चर्चा बीएमसी पालिका वर्तुळात सुरू झालीय. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे नेते संदीप देशपांडे सगळ्यांनीच आयुक्तांनी नेत्याचं नाव सांगावं असं म्हटलं. आता संजय निरुपम यांच्या ट्विटनं वादाला वेगळं वळण प्राप्त होतंय की काय असं वाटतंय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments