Placeholder canvas
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्‍ट्रकुरिअर कार्यालयात स्फोट झालेले पार्सल पुण्याच्या संजय नहारांच्या नावे!

कुरिअर कार्यालयात स्फोट झालेले पार्सल पुण्याच्या संजय नहारांच्या नावे!

महत्वाचे…
१. अहमदनगर पोलिस चौकशीसाठी पुण्यात दाखल
२. कुरिअर कंपनीचे दोन कर्मचारी जखमी
३. पार्सल पुण्यातील सरहद या स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख संजय नहार यांच्या नावे


पुणे: अहमदनगरमधील एका कुरिअर कंपनीच्या कार्यालयात आलेल्या पार्सलचा काल (मंगळवारी) रात्रीच्या सुमारास मोठा स्फोट झाला होता. यामध्ये कुरिअर कंपनीचे दोन कर्मचारी जखमी झाले होते. मात्र, हे पार्सल पुण्यातील सरहद या स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख संजय नहार यांच्या नावे असल्याची माहिती उघड झाली आहे. त्यामुळे नहार यांच्या घातपातासाठी हे पार्सल पाठवण्यात आले होते का? याचा संशय बळावला आहे.

हे पार्सल अहमदनगरमधून पुण्यात पाठवण्यात येणार होते. दरम्यान, अहमदनगर पोलिस नहार यांच्याकडे अधिक चौकशीसाठी पुण्यात दाखल झाले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, अहमदनगरमधील माळीवाड्यातील मारुती कुरिअर कंपनीच्या कार्यालयात मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास या पार्सलचा स्फोट झाला होता. यावेळी कार्यालयात तीन जण काम करीत होते. या स्फोटात संदीप भुजबळ आणि संजय क्षीरसागर असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांची नावं आहेत. दोघांवर अहमदनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा स्फोट इतका जबरदस्त होता की, याच्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांनी घाबरुन घराबाहेर धाव घेतली होती.

पार्सल अहमदनगरवरुन पुण्याच्या पत्त्यावर पाठवले जाणार होते. मात्र, आता पोलिसांच्या चौकशीमध्ये हे पार्सल पाठवणाऱ्याचा पत्ता बनावट असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे हा घातपाताचा कट असल्याचा संशय बळावला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments