Placeholder canvas
Wednesday, May 1, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेशरद पवार - सोनिया गांधींच्या भेटीनंतर राज्यातील सत्ताकोंडी फुटणार

शरद पवार – सोनिया गांधींच्या भेटीनंतर राज्यातील सत्ताकोंडी फुटणार

पुणे: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उद्या सोमवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत राज्यातील सत्ताकोंडीवर चर्चा होणार आहे. त्यानंतर मंगळवारी राज्यातील दोन्ही काँग्रेसचे नेते एकत्र बसून पर्यायी सरकार निर्माण करण्यावर शिक्कामोर्तब करणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यात राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी ही माहिती दिली. आजच्या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे. त्यामुळे राज्यात पर्यायी सरकार निर्माण झालं पाहिजे, असा निष्कर्ष या बैठकीत काढण्यात आला. आम्ही राज्यात काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढलो. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना काँग्रेससोबत चर्चा केली जाईल, त्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं मलिक म्हणाले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उद्या दिल्लीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा होईल. त्यानंतर मंगळवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांची मुंबईत बैठक होईल. या बैठकीत पर्यायी सरकार स्थापन करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments