Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रकोल्हापूरगोकुळ शिरगावमधील युरोटेक्स इंडस्ट्रीजच्या कामगारांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू - कामगार राज्यमंत्री...

गोकुळ शिरगावमधील युरोटेक्स इंडस्ट्रीजच्या कामगारांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू – कामगार राज्यमंत्री संजय भेगडे

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ-शिरगाव औद्योगिक वसाहतमधील युरोटेक्स इंडस्ट्रीज अॅन्ड एक्सपोर्ट लि. कंपनीतील 1200 कामगारांच्या सोबत राज्य सरकार खंबीरपणे उभे असून कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नसल्याची ग्वाही कामगार राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी आज येथे दिली.

मंत्रालयातील परिषद सभागृहात आज गोकुळ-शिरगाव औद्योगिक वसाहतमधील युरोटेक्स इंडस्ट्रीजच्या कामगारांच्या समस्यांबाबत झालेल्या बैठकीत श्री.भेगडे बोलत होते.

श्री.भेगडे यांनी सांगितले की, राज्य सरकार पूर्णपणे कामगारांच्या बाजूने असून कंपनी प्रशासन, कामगार विभाग आणि कामगार संघटना यांच्या समन्वयातून कामगारांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत 1200 कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ देणार नाही. कामगार कायद्यानुसार कोणावरही अन्याय होऊ देणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी कामगारांना दिली.

यावेळी कामगार संघटनांच्या शिष्टमंडळांनी आपल्या व्यथा मंत्री महोदयांसमोर मांडल्या. बैठकीला कामगार विभागाचे संबंधित अधिकारी, कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र जोशी, दत्तात्रय बुजरे, बंडोपंत मोरे, सतीश भोसले आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments