राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध बुधवारी ईडीने मनी लाँड्रिंग तपासाचा भाग म्हणून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापेमारी केली. ईडीने केलेली कारवाई मुश्रीफ यांच्याशी संबंधित असलेल्या राज्यातील काही साखर कारखान्यांच्या कामकाजातील कथित अनियमिततेशी संबंधित असल्याचे समजते.
सकाळी साडेसहा वाजल्यापासून मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथील परिसर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली.
हसन मुश्रीफ (६८) हे कोल्हापुरातील कागल मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष देखील आहेत.
मुश्रीफ यांनी एक इंस्टाग्राम व्हिडिओद्वारे संदेश पोस्ट केला ज्यात त्यांनी त्यांच्या समर्थकांना ईडीमार्फत करण्यात येत असलेल्या कारवाईत अडथळा आणू नका असे आवाहन केले.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०२१ मध्ये माजी ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर कुटुंबातील सदस्य आणि कंपन्यांच्या माध्यमातून ‘बेनामी’ संस्था धारण करून भ्रष्ट व्यवहारात गुंतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीने हे आरोप फेटाळून लावले होते.
Web Title: Aamdar Hasan Mushrif yanchyaviruddha ED chi kaarvaai