Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रकोल्हापूरकोल्हापूर, सांगलीत पुराने हाहाकार उडाला

कोल्हापूर, सांगलीत पुराने हाहाकार उडाला

कोल्हापूर, सांगलीत पुराने हाहाकार उडाला असताना हवामान विभागाने अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. कोल्हापूर, सातारा आणि पुण्यात (9 ऑगस्ट) ला मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. 204 मिमी पेक्षा जास्त पावसाची शक्यता असल्यास रेड अलर्ट जारी करण्यात येतो.

युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरु

कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यात पूरस्थिती कायम असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. विभागातील 1 लाख 32 हजार 360 पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. बचाव व मदत कार्यावर प्रशासनाने भर दिला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मुंबईत येणारा दुध पुरवठा खंडीत

कोल्हापूरमधून दररोज लाखो लीटर दुधाचा पुरवठा मुंबईत होत असतो. कोल्हापूरमधून या दुधाचा मुंबई, ठाणे, वसई-विरार, पनवेल भागात पुरवठा केला जातो. आज हा दूध पुरवठा झाला नाही. मुंबईची दररोज दुधाची गरज ही 80 लाख लीटरची आहे. यामध्ये अमूल 12 लाख लीटर दुधाचा पुरवठा करते. तर गोकुळ 6 लाख आणि वारणा 2 लाख लिटर दुधाचा पुरवठा करते. कोल्हापूर-सांगलीमधून विविध कंपन्यांचे मुंबईत दररोज 13 लाख लीटर दूध दाखल होते. मुंबईमध्ये देशभरातून दररोज एकूण 55 लाख लीटर दूध पॅकिंग पिशव्यांमधून पुरवलं जातं, तर 25 लाख लीटर दूध टँकरद्वारे आणलं जातं. परंतु पुरा मुळे रस्ते वाहतूक ठप्प झाल्या मुळे दुध पुरवठा खंडित झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments