Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्‍ट्रकाळ्या यादीत टाकल्याने कॅब चालकांचा सोमवारी संप!

काळ्या यादीत टाकल्याने कॅब चालकांचा सोमवारी संप!

पुणे : वाढत्या स्पर्धेमुळे कॅब चालकांचीही आता आर्थिक परवड होऊ लागली आहे. कर्जाने घेतलेल्या वाहनांची कर्जे फेडण्यापुरते पैसेही मिळत नसल्याचा दावा चालक करत आहेत. त्यातच प्रवासी वाहतुक करणाऱ्या खासगी कंपन्यांकडून काळ्या यादीत टाकले जात आहे. याच्या निषेधार्थ राज्यातील ओला, उबेर चालक उद्या १९ मार्च रोजी संपावर जाणार आहेत. पुणे शहरातील सुमारे २० हजारांहून अधिक कॅबचालक या संपात सहभागी होणार आहेत.

मागील काही वर्षांपासून ओला, उबेर या प्रवासी वाहतुक करणाऱ्या कंपन्यांच्या सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे पुण्यासह मुंबई, ठाणे व अन्य काही शहरांमध्ये रिक्षा, टॅक्साचालकांशी स्पर्धा वाढली आहे.त्यामुळे पुर्वी होणारा व्यवसाय व सद्यस्थितीतील व्यवसायात फरक पडला आहे. आता कंपन्यांच्या जोडल्या गेलेल्या कॅबचालकांना हा व्यवसाय परवडेना झाला असल्याचा दावा चालक करत आहेत. यापार्श्वभुमीवर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेनेने राज्यात सोमवारी कॅबचालकांचा संप पुकारला आहे. मध्यरात्रीपासून कॅबचालक संप करून ओला, उबेरने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याला १.२५ लाख रुपये व्यवसायाची हमी द्यावी, कारच्या श्रेणीनुसार भाडे देण्यात यावे, कमी दराची बुकींग बंद करावी, ओला, उबेरने स्वत:कडील गाड्या बंद कराव्यात, काळ्या यादीत टाकलेल्या गाड्या व वाहन चालकांचा व्यवसाय पुन्हा सुरू करावा आदी मागन्या चालकांनी केल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments