Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रमोदी सरकारने राफेल घोटाळा केला : राज ठाकरे

मोदी सरकारने राफेल घोटाळा केला : राज ठाकरे

raj thakaray, shivaji park, mumbai, MNS

मुंबई- बोफोर्सपेक्षाही मोठा घोटाळा सध्याच्या सरकारने राफेलमध्ये घोटाळा केला आहे. परंतु त्याची चर्चा नाही त्याच्या बातम्या का नाही? अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजीपार्कवर केंद्र राज्य सरकारच्या भ्रष्टाचारा बाबत कडाडून टीका केली.  

राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे –  

  • बेरोजगारांची नोंदणी करायची नाही, असा फतवा केंद्र सरकारने काढलाय, यामुळे भविष्यात भारतात किती बेरोजगार आहेत याची माहितीच मिळणार नाही
  • महाराष्ट्रातल्या तरुणांना नोकरी नाही, बाहेरुन येतायत त्यांना घरं दिली जात आहेत, महाराष्ट्रात सुखी कोण आहे?
  • महाराष्ट्रात जातीपातीचे भांडणं आहेत, आरक्षणासाठी भांडणं आहेत, पण बाहेरुन येणारे नोकरी मिळवत आहेत
  • महाराष्ट्रात बसवलेला मुख्यमंत्री, स्वतःच्या आत्मविश्वासावर आलेला नाही
  • धर्मा पाटीलांची जमीन २०४ गुंठे आहे तिथे त्यांना ४ लाख मोबदला दिला गेला, आणि बाजूच्याच जमिनीला जी ७४ गुंठे आहे, तिला कोट्यवधी रुपये दिले गेले
  • दलाल राज्य करत आहेत- राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
  • एवढी मोठी चूक केल्यावरही सरकारबद्दल काही बोलायचं नाही. त्यांच्याविरोधात काही लिहून येत नाही.
  • देशातला मीडिया आणि वर्तमानपत्रं. इतरांच्या बाबतीत रकानेच्या रकाने भरून येणार.
  • विलासराव देशमुख ताजमध्ये गेले, त्यात राम गोपाल वर्मा होते. केवढी टीका. या सरकारकडून घडणाऱ्या गोष्टींवर ब्र काढायला तयार नाही.
  • विश्वदीपक न्यूज प्रॉड्युसरने राजीनामा दिला. हा सगळा मीडिया सरकार नियंत्रित करतोय. काय बातम्या द्यायच्या, कशा द्यायच्या. सगळ्या मालकांना सांगितलं गेलंय. काही ठिकाणी पत्रकार, संपादकांना काढून टाकलं. मोदी आणि शहांनी सांगितलं. त्यांच्या विरोधात बातम्या दिल्यात, तर जाहिराती बंद करून टाकणार.
  • कोणत्या देशात जगतोय आपण? ही आणीबाणी नाही तर काय आहे? श्रीदेवीची बातमी जितक्या वेळा टीव्हीवर दाखवली, तितक्या वेळा न्यायमूर्ती लोयांच्या खुनाच्या बातम्या दाखवल्या का? आता १०० न्यायाधीशांच्या बदल्या.
  • न्यायाधीशांवरही सरकारचा दबाव. हे सगळं तंत्र अॅडॉल्फ हिटलरच्या पुस्तकात मिळेल. जे विरोधात आहेत, त्यांना संपवून टाकायचं किंवा घाबरवायचं. या गोष्टींसाठी माझा मोदींवर राग.
  • जे मेट्रोचं काम चालू आहे, त्याच्या विरोधात बातम्या द्यायच्या नाहीत, असं सगळ्यांना सांगितलंय. याला लोकशाही म्हणणार आपण? हे अच्छे दिन?
  • महाराष्ट्रासारखं एक राज्य गप्प बसलंय. वाट्टेल ते आकडे सांगतात. नितीन गडकरींना तर हौसच आहे. साबणाचे फुगे उडवत असतात. कुठेही गेले एक लाख कोटी, दोन लाख कोटींचे फुगे उडवतात. ते आले की करा ‘फू’
  • ५६ हजार विहिरी बांधल्या म्हणे. मी विरोधासाठी विरोध करणारा माणूस नाही. महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या हिताची गोष्ट केली तर सरकारचं अभिनंदन करेन. मी कोता नाही.
  • आजच्या काळातले मनोज कुमार. सरकारच्या चित्रपटांमध्ये काम करतोय. भारत, भारत जे चालू आहे
    पण अक्षय कुमार हा कॅनडाचा नागरिक नाही.
  • पॅडमॅन, टॉयलेट एक प्रेम कथा हे सिनेमे सरकार स्पॉन्सर करतंय, हे काम करायला अक्षय कुमार आहे
  • शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. कम्युनिस्टांचा झेंडा हातात घेतला, मग हे शेतकरी की नक्षली, अशी चर्चा.
  • दलाल राज्य करताहेत.
  • वृत्तपत्र, चॅनल्स, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं
  • मोदी आणि अमित शाह यांच्या सांगण्यावरुन कित्येक वृत्तपत्र आणि चॅनल्समध्ये पत्रकारांना, संपादकांना काढून टाकण्यात आलं
  • श्रीदेवीची बातमी मीडिया दाखवते परंतु, न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूची बातमी का दाखवली नाही
  • असेल मोठी अभिनेत्री. पण असं काय क्रांतिकारी कार्य की तिचा पार्थिव देह राष्ट्रध्वजामध्ये गुंडाळला गेला होता?
  • श्रीदेवीने असं काय काम केलं होतं, ज्यामुळे तिचा मृतदेह राष्ट्रध्वजामध्ये गुंडाळण्यात आला?
  • देशात, महाराष्ट्रात काय चाललंय समजतच नाही. नीरव मोदी प्रकरण चालू होतं. अचानक श्रीदेवी गेल्याची बातमी मिळाली. नीरव मोदी हे प्रकरण मागे पडावं म्हणून श्रीदेवीचं प्रकरण तापवत बसले. हजार कोटी घेऊन पसार झाला देशातून.
  • ४० वर्षानंतर हा कोण सांबा. नंतर कळलं मुनगंटीवार. दगडावर चढून. हातवारे करत. रजनीकांतचा बारावा डमी. हे काय काम आहे का मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांचं.
  • तो गाण्याचा अल्बम मी बघितला. मला सुरुवातीला कळलं नाही की ते गाताहेत की शारीरिक कसरती करताहेत? वर्गातला मॉनिटर आहे.
  • मुख्यमंत्री म्हणजे वर्गातला मॉनेटर आहेत; शिक्षकांचा आवडता, पण विद्यार्थ्यांचा नावडता
  • गेल्या वर्षी कौटुंबिंक कारणामुळं सभा घेता आली नाही, यावर्षीपासून प्रत्येक वर्षी मनसेची सभे होणार
  • महाराष्ट्रात सध्या काही गंभीर प्रश्न आहेत असं वाटत नाही. सर्व प्रश्न संपलेले आहेत. सर्व ठिकाणी आनंदीआनंद. सर्वच प्रश्न संपले असल्यामुळे मुख्यमंत्री, अर्थमंत्री गाणं गाताहेत.
  • बरेच दिवस झाले फुल फ्लेज बोललो नाही.
  • सर्वांना गुडीपाडव्याच्या शुभेच्छा
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष संपला असं ज्यांना वाटतं, त्यांनी व्यासपीठावर यावं आणि हा जिवंत महाराष्ट्र पाहावा

 सविस्त वृत्त लवकरच….

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments