Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्‍ट्रचोरट्याची ईमानदारी: चोरीचे पैसे ठेवून लायसन्स केले कुरियर!

चोरट्याची ईमानदारी: चोरीचे पैसे ठेवून लायसन्स केले कुरियर!

Driving licencपुणे: चोरटे पर्स चोरी केल्यानंतर त्याच्यातील पैसे काढून घेतात व पर्समधील इतर सामान फेकून देतात परंतु एक चोरट्याने पर्स मधले पैसे काढून घेतले व लायसन्स समोरच्या व्यक्तीला त्याच्या पत्यावर कुरीअरने पाठवून दिले. होय हे सत्य आहे. कारण यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही.

वानवडी येथे राहणा-या स्वरा यांची पर्स १७ मार्चला चोरी गेली होती. या महागड्या पर्समध्ये काही मौल्यवान वस्तू आणि ड्रायव्हिंग लायसन्स होतं. चोराने त्यांची महागडी पर्स आणि त्यातील १५०० रुपये ठेवून घेतले आणि लायसन्स कुरिअरने पाठवून दिलं. स्वरा यांनी चोराच्या या प्रामाणिकपणाचं कौतूक केलं आहे. नवीन लायसन्स मिळवण्यासाठी आपल्याला प्रचंड वेळ खर्च करावा लागला असता, पण जुनं लायसन्स मिळाल्याने आपला वेळ वाचला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. माझं लायसन्स परत मिळाल्याने मी प्रचंड आनंदी आहे. हे फक्त पुण्यातच होऊ शकतं’, असं त्यांनी म्हटलं आहे.

एमजी रोडवर स्वरा यांचं बुटिक आहे. रोज संध्याकाळी बुटिक बंद केल्यानंतर त्या वॉकसाठी जातात. ‘मी तिथे स्कूटरने जात असे. माझ्या मुलाने मला एसयूव्ही गिफ्ट केली आहे, म्हणून मग मी ती नेण्यास सुरुवात केली’, असं स्वरा यांनी सांगितलं आहे. १७ मार्चला नेहमीप्रमाणे स्वरा यांनी बुटिक बंद केलं आणि नेहमीच्या ठिकाणी कार पार्क केली. ‘मी कारमध्ये पर्स ठेवली होती. मी शक्यतो माझा मोबाइलही कारमध्ये ठेवते, पण त्यादिवशी मला माझ्या पतीशी बोलायचं असल्या कारणाने मोबाइल सोबत नेला होता’, असं त्यांनी सांगितलं आहे.

२५ मिनिटांनी जेव्हा स्वरा परत आल्या तेव्हा त्यांनी कारची काच फोडल्याचं पाहिलं. कारमधून त्यांची पर्स चोरीला गेली होती. ‘मी माझा आयपॅड मागच्या सीटवर ठेवला असल्या कारणाने तो चोराने पाहिलं नाही ते नशीब. सीट कव्हरमुळे चोराच्या ते लक्षात आलं नसावं’, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

स्वरा यांनी तात्काळ वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. ‘माझ्या पर्समध्ये १५०० रोख रुपये, ड्रायव्हिंग लायसन्स आणि काही मौल्यवान वस्तू होत्या. माझी पर्स मोठ्या मुलाने भेट दिली असल्याने ती मला खूप प्रिय होती’, असंही त्यांनी सांगितलं आहे.

पर्स चोरी गेल्यापासूनच स्वरा डुप्लिकेट लायसन्स मिळवण्यासाठी प्रयत्न करत होत्या. डुप्लिकेट लायसन्स मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा की मुलाची मदत घ्यावी हे कळत नव्हतं. मुलगा मार्च अखेर असल्याने कामात व्यस्त होता आणि त्याने १ एप्रिलला मदत करायचं आश्वासन दिलं होतं. पण त्याआधीच मला लायसन्स मिळाल्याने प्रचंड आनंद झाला आहे’, अशी प्रतिक्रिया स्वरा यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments