Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबाद३३ रक्तदात्यांनी रक्तदान करुन शहिदांना दिली श्रध्दांजली!

३३ रक्तदात्यांनी रक्तदान करुन शहिदांना दिली श्रध्दांजली!

Blood donet, aurangabadऔरंगाबाद: दक्षिण काश्मीरात शहिद झालेल्या तीन जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी सु-लक्ष्मी बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे सर्वेसर्वा समाजसेवक सुमीत पंडित यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी ३३ रक्तदात्यांनी रक्तदान करुन शहिदांना श्रध्दांजली अर्पण केली. रक्तदान शिबिर जटवाडा रोड एस.पी.जेन्टस् पार्लर येथे सोमवारी २ मार्च रोजी पार पडला.

या रक्तदान शिबिराचे उदघाटन बेगमपूरा पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक श्रीमती राजश्री आडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी छावणी विकास युवा मंचचे मयांक पांडे,ओमकार सिंह यांची विशेष उपस्थिती होती. रक्तदान शिबिराला ग्लेज टे्डिंग ईडिया प्रा.ली, आणि शिवाजी इन्टरप्रायजेस यांचे विशेष सहकार्य लाभले. रक्तदान शिबिरात सुमित पंडित, माजी सैनिक गजानन पींपळे. पोलीस पाटील लक्ष्मण बोर्ड. संतोष सोमानी, विशाल नांदरकर, मयांक पांडे,ओमकार सिंह, प्रफुल्ल तीळवे यांच्यासह ३३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्त संकलन शासकीय रुग्णालयात घाटीतर्फेँ करण्यात आले.घाटी रुग्णालयातर्फ डॉ सुनीता बनकर,डॉ किरन कुऱ्हाडे, डॉ प्रियका बींझाडे, व  रक्त पेढी कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे आयोजन सु-लक्ष्मी बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुमित पंडित यांनी केले होते. नेहमीच समाजपयोगी कार्यक्रम संस्थेतर्फे राबविले जातात असेही पंडित यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments