Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रविदर्भाने पहिल्यांदा पटकावला रणजी करंडक!

विदर्भाने पहिल्यांदा पटकावला रणजी करंडक!

इंदूर – विदर्भाने आज इंदूरच्या होळकर मैदानावर विक्रमाची नोंद केली. रणजी करंडक अंतिम सामन्यात विदर्भाने दिल्लीच्या संघाला धुळ चारत ऐतिहासिक विजय मिळवला. विदर्भाच्या संघाने ९ गडी राखून दिल्लीचा पराभव करत पहिल्यांदाच रणजी करंडकावर नाव कोरले. हॅट्ट्रिक घेणाऱ्या विदर्भाच्या रजनीश गुरबानीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. या विजयानंतर विदर्भाच्या खेळाडूंनी जल्लोष साजरा केला. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.

पहिल्या डावात अक्षय वाडकरच्या १३३ धावांच्या जोरावर विदर्भाने २५२ धावांची आघाडी घेतली. याला उत्तर देताना दिल्लीची फलंदाजी ठेपाळली. अवघ्या दोनशे धावांवर दिल्लीचा निम्मा संघ माघारी परतला. विदर्भाच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाने सर्वबाद २८० धावांची मजल मारत २९ धावांचे आव्हान विदर्भाच्या संघा समोर ठेवले. एक गडी गमावून विदर्भाने हे आव्हान सहज पार केले. विदर्भाच्या आदित्य वखारेने ४ गडी बाद केले. तर रजनीश गुरबानी २, आदित्य सरवटे ३ आणि सिद्धेश नेरालने १ गडी बाद केला. हॅट्ट्रिक घेणाऱ्या विदर्भाच्या रजनीश गुरबानीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments