Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रवसईत अनधिकृत बांधकामं, तहसीलदारांना मनसेचा घेराव!

वसईत अनधिकृत बांधकामं, तहसीलदारांना मनसेचा घेराव!

ठाणे : वसईतल्या अनधिकृत चाळींच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. वसईत तहसिलदारांच्या कार्यालयात मनसे कार्यक्रत्यांनी ठिय्या मांडून अनधिकृत चाळींवर कारवाईची मागणी केली.

वसईतल्या राजीवली वाघरालपाडा परिसरात डोंगर भूईसपाट करुन परप्रांतियांनी चाळी उभ्या केल्या आहेत. महत्वाचं म्हणजे इथं वन विभागाची ६ हजार एकर आणि आदिवासींसाठी आरक्षित जागा आहे. मात्र महसूल आणि पोलीस खात्याला खिशात ठेवून परप्रांतियांनी इथं अतिक्रमण केलं आहे. त्यांना स्थानिक बिल्डरांचंही पाठबळ मिळतंय.

चाळमाफियांनी काय हैदास घातला आहे?
वसई-विरार या परिसरातील सहा हजार हेक्टर शासकीय जमीन, डोंगर भुईसपाट करुन, महापालिका, महसूल विभाग, वन विभाग आणि पोलिसांच्या डोळ्यादेखतं हजारो चाळी या माफियांनी वसवल्या आहेत. कारवाई करण्यास गेलेल्या अधिकाऱ्यांच्या गाड्या या चाळमाफियांनी आपल्या हस्तकांकरवी जाळल्या होत्या.

नेमकं प्रकरण काय आहे?
वसई पूर्वेकडील राजीवली वाघरालपाडा परिसरात सहा हजार हेक्टर जागा वनविभाग, शासकीय, आरक्षित, तसेच आदिवासी जागा होत्या. आदिवासींना धमकावून शासकीय बांबूना हाताशी धरुन, येथे चाळमाफियांनी अनधिकृत चाळींचं साम्राज्य उभं केलं आहे. या परिसरात दुसरी ‘धारावी’च वसवलेली आहे.
धक्कादायक म्हणजे, चाळमाफियांनी या भागात मोठ-मोठे डोंगर पोखरले आहेत. नैसर्गिक नाले मातीचा भराव टाकून बंद करण्यात आले आहेत. डोंगर पोखरुन राजरोसपणे चाळींची बांधकामं सुरुच आहेत. जर कुण्या स्थानिक नागरिकांनी विरोध केला तर त्याला जीवे मारण्याची धमकी दिली जाते.
महापालिका, महसूल आणि पोलीस प्रशासन हे सर्वजण आपल्या खिशातच असल्याचे सर्वसामान्यांना सांगून, तक्रारी जागच्या जागी दाबल्या जात आहेत.चाळमाफियांची दादागिरी आणि भ्रष्ट प्रशासनाची हतबलता, यामुळे सर्वसामान्य भूमीपुत्र मात्र हतबल होत असल्याचेच चित्र वसई-विरारमध्ये पाहायला मिळत आहे.

राज ठाकरेंकडून दखल
राज ठाकरेंनी आपल्या भाषणात जे रेट कार्ड दाखवला होतं, तेच एबीपी माझाने बातमीत दाखवले होते. तीन ते चार लाखात रुम, पाचशे ते हजार रुपयात रुम भाड्याने, २४ तास पाणी, २४ तास लाईट, तर रेल्वे स्टेशनपासून ने-आणची सुविधा, अशा अनेक सुविधांचा उल्लेख या चाळमाफियांच्या पत्रकात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments