Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रउध्दव ठाकरे संजय राऊतांच्या भेटीसाठी लिलावतीत

उध्दव ठाकरे संजय राऊतांच्या भेटीसाठी लिलावतीत

Uddhav Thackeray meets Sanjay Raut at lilavati hospital
Image Representation

मुंबई : सोमवारी रात्री राऊत यांच्या अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेजेस आढळून आले. त्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे संजय राऊत यांना भेटण्यासाठी लिलावती रुग्णालयात गेले आहेत. कालपासून राऊतांच्या भेटीसाठी रुग्णालयात रिघ लागली आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी लिलावती रूग्णालयात जाऊन राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली. दरम्यान, सर्व धावपळीत पवार कुटुंबियांनी लिलावती रुग्णालयामध्ये जाऊन राऊतांशी भेट घेतली. जवळपास १५ मिनिटं पवार लिलावतीमध्ये होते, यावेळी त्यांनी राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पवार आणि राऊतांमध्ये जवळपास राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. त्यामुळे काही तरी वेगळं घडणार असल्याची चर्चा आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून शिवसेनेची बाजू आक्रमकपणे मांडणारे संजय राऊत यांच्यावर सध्या लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेजेस आढळल्यानंतर प्रथम त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली, नंतर त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. सोमवारी दुपारच्या सुमारासच त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या राऊतांच्या भेटीसाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांची रिघ लागली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments