Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यातील सत्तेच्या पेचप्रसंगावरून बैठकांचा सिलसिला

राज्यातील सत्तेच्या पेचप्रसंगावरून बैठकांचा सिलसिला

Congress NCP Shivsena BJP
महाराष्ट्रातील पेचप्रसंगावरून दिल्लीत काँग्रेसची बैठक काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. तर दुसरीकडे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरु असून, दुपारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहेत. आज मंगळवारचा दिवस सर्वच राजकीय पक्षांच्या बैठकांचा दिवस असणार आहे. आज रात्री साडेआठ वाजेपर्यंत राष्ट्रवादीला सत्तास्थापन करण्याची मुदत राज्यपालांकडून मिळालेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची कसोटी लागलेली आहे.

दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीच्या नेतृत्वाखाली ए.के अॅंटनी, के.सी वेनूगोपाल, इतर नेत्यांच्या उपस्थितीत बैठक सुरु आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक वाय.बी. सेंटरमध्ये सुरु आहे. आज रात्री साडेआठ वाजेपर्यंत राष्ट्रवादीला सत्तास्थापन करण्याचा 145 चा जादुई आकडा आहे तो दाखवावा लागणार आहे. त्यामुळे काँग्रेस, शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय राष्ट्रवादी सत्तास्थापन करण्याचा दावा राज्यपालांकडे सादर करु शकत नाही. त्यामुले आज दिवसभर काय घडतं याकडे सर्व काही अवलंबून आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठबळावर सत्ता स्थापन करण्याचा दावा सोमवारी शिवसेनेने राज्यपालांकडे केला असला तरी १४५ सदस्यांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करण्यास पक्षाला अपयश आले. पत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याची शिवसेनेची मागणी फेटाळून राज्यपालांनी तिसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापन करण्याची संधी दिली. यामुळे सत्ता स्थापनेचा घोळ सुरूच असून, आज मंगळवारच दिवस महत्वाचा मानला जात आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करायचे, असा शिवसेनेचा प्रयत्न होता. यातूनच शिवसेनेने केंद्रातील सरकारमधून बाहेर पडावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी व काँग्रेसने व्यक्त केली होती. यानुसार केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला. तो राजीनामा मंजूरही करण्यात आला. सरकार स्थापण्याबाबत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चाही झाली. काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत शिवसेनेबरोबर हातमिळवणी करण्यास विरोध झाला होता. पण राज्यातील नेत्यांची तीव्र भावना लक्षात घेता, पुन्हा बैठक बोलाविण्यात आली.

सोमवारी काँग्रेसने सुमारे साडेतीन तासांच्या बैठकीनंतरही काहीच निर्णय घेतला नाही. काँग्रेसकडून पाठिंब्याचे पत्र प्राप्त होईल, अशी चर्चा सुरू झाली. साडेसातपर्यंत राज्यपालांनी शिवसेनेला मुदत दिली होती. शिवसेना नेते पावणेसात वाजता राजभवनवर पोहोचले. पण काँग्रेसकडून पाठिंब्याचे पत्रच प्राप्त झाले नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीचा पाठिंबा गृहीत धरून शिवसेनेने सरकार स्थापण्याचा दावाही केला होता. पण पाठिंब्याचे पत्र सादर करू शकले नाहीत.

काँग्रेसची बैठक रात्री आठपर्यंत सुरू होती. काँग्रेसने पाठिंब्याबाबत कोणताही निर्णय न घेतल्यामुळे शिवसेनेला पत्र देता आला नाही. काँग्रेसचे पत्र न आल्याने राष्ट्रवादीनेही राज्यपालांना पत्र दिले नाही. मित्र पक्षांनी तत्त्वत: मान्यता दिली असली तरी पत्र नंतर सादर करू, असे शिवसेनेच्या वतीने राज्यपालांना विनंती करण्यात आली. पण राज्यपालांनी पत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यास नकार दिला.

काँग्रेस व राष्ट्रवादीकडून पत्र प्राप्त न झाल्याने १४५ पेक्षा जास्त सदस्यांच्या पाठिंब्याचे पत्र शिवसेना सादर करू शकली नाही. मात्र आज राष्ट्रवादीला रात्री साडेआठ वाजेपर्यंतचा वेळ राज्यपालांनी दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी सत्तास्थापन करण्याचा दावा करु शकते की नाही याचीच चर्चा सर्वत्र सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments