Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रकोरोना व लॉकडाऊनमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या कल्याणकरांना विविध संस्थांतर्पेâ श्रध्दांजली

कोरोना व लॉकडाऊनमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या कल्याणकरांना विविध संस्थांतर्पेâ श्रध्दांजली

श्रध्दांजली सभेसाठी नागरीकांचा मोठा सहभाग

India's first coronavirus death confirmed in Karnatakaकल्याण : कोरोनाचा सर्वाधिक फटका कल्याण शहराला बसला. कोरोना व लॉकडाऊन सुरु झाल्यापासून विविध कारणाने शेकडो कल्याणकरांचा बळी गेला. त्या सर्व व्यक्तींना कल्याण शहरातर्पेâ श्रध्दांजली वाहण्यात आली. संपूर्ण शहरातर्पेâ प्रथमच झालेल्या या श्रध्दांजली सभेसाठी कल्याणकरांनी मोठी गर्दी केली होती.

सार्वजनिक वाचनालय, महाराष्ट्र साहित्य परिषद, काव्य किरण मंडळ, अखिल भारतीय साहित्य परिषद, दैनिक जनमत यांच्यावतीने सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात दिवंगतांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या श्रध्दांजली सभेत शहरातील विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या श्रध्दांजली सभेत ६३ दिवंगतांना तसेच ज्ञात-अज्ञात शेकडों दिवंगतांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. सभेच्या प्रारंभी सतिश केतकर यांनी किरण जोगळेकर यांच्यावरील केलेल्या श्रद्धा कवितेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमात ३५ संस्थांचे प्रतिनिधी व दिवंगतांचे कुटुंबीय, नागरिक उपस्थित होते.

कोरोना लॉकडाऊनमुळे देशात मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊन सर्व दृष्ट्या शिथिल करून धार्मिक स्थळे, मंदिरे, उपनगरी गाड्या (लोकल) सुरु करण्याचा आग्रह धरतानाच त्यामागचा धोकाही सर्वांनी समजून घेतला पाहिजे असे विचार कल्याण शिवसेनेचे संघटक रविंद्र कपोते यांनी व्यक्त केले व त्यांनी दिवंगतांना श्रध्दांजली अर्पण केली. कल्याण शहरात कोरोना व लॉकडाऊनमध्ये बळी पडलेल्यांची दखल घेऊन सर्वांसाठी श्रध्दांजली सभा हे एक आगळेवेगळे उदाहरण असून पुढे कधीही येवू घातलेल्या संकटाला मार्गदर्शन करणारे आहे असे दैनिक जनमतचे तुषार राजे यांनी सांगितले. १९१८ साली आलेल्या प्लेगच्या साथीने कल्याणकरांचे किती नुकसान झाले याची योग्य माहिती उपलब्ध नाही. यावर्षी म्हणजेच २०१९-२०२० मधील महामारीची माहिती पुढील शंभर वर्षे उपलब्ध झाली पाहिजे. १९१८ साली आलेल्या महामारीपेक्षा आपल्याला कमी त्रास झाल्याचे त्यांनी सांगितले.

माणूस हा समाजप्रिय आहे. समुदायाने रहाणे, एकमेकांवर प्रेम करून अडीअडचणीला एकमेकांना सहाय्य करणे हा त्याचा स्थायीभाव असल्याने तो जवळ येणारच! अशावेळी आपणच आपली काळजी घेऊन कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवले पाहिजे असे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष राजीव जोशी यांनी यावेळी सांगितले.

सर्वात शेवटी श्रद्धासुमने अर्पण करतांना दैनिक जनमतचे संपादक तुषार राजे यांनी दिवंगतांनी सुरु केलेली सामाजिक कामे पुढे सुरु राहीली पाहिजेत, किरण जोगळेकर सारख्या साहित्यिकाच्या नावे एखादा पुरस्कार तसेच राजेंद्र देवळेकर व अन्य व्यक्तींच्या आठवणी जपल्या पाहिजेत असे आवाहन केले.

श्रध्दांजली सभेचे सूत्रसंचालन काव्य किरण मंडळाचे कार्याध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी केले. सुमारे दोन तास सुरु असलेल्या या भावपूर्ण समारोहात शेवटपर्यंत मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते. साहित्यिक जनार्दन ओक, मेहेर बाबा सत्संगाचे कोल्लूर, शब्दसुमने समुहाच्या अनिता कळसकर, अ‍ॅड गणेश सोवनी यांनी शोकसंदेश पाठविले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments