Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रग्रँड मराठा फाऊंडेशनने ठाण्यातील 200 वंचित गटातील मुलांच्या आयुष्यात आणला दिवाळीचा आनंद

ग्रँड मराठा फाऊंडेशनने ठाण्यातील 200 वंचित गटातील मुलांच्या आयुष्यात आणला दिवाळीचा आनंद

Grand Maratha foundationठाणे (प्रतिनिधी)- ग्रँड मराठा फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने ठाणे शहरातील सुमारे 200 वंचित मुलांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर  शालेय पुस्तके, खेळणी, चपला आणि कोरडे धान्य मोफत दिले. ठाण्यातील माजिवडा येथील नवजीवन प्राथमिक विद्यामंदिर येथे वितरित करण्यात आले.

दिवाळीच्या काळात वंचित, गोरगरीब मुले आनंदापासून वंचित राहू नयेत, या उद्देशाने सदर संस्थेने हे कार्य केले आहे. या आधी या संस्थेच्या वतीने येऊरमधील आदिवासी बांधवांची आरोग्य तपासणी करुन त्यांना औषध पुरवठा केला होता. आताच्या या मोहिमेमुळे सुमारे 200 मुले आणि कुटुंबांना लाभ झाला. ग्रँड मराठा फाऊंडेशनचे विश्वस्त श्रीमती माधवी शेलटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला होता.

यावेळी ग्रँड मराठा फाऊंडेशनचे संस्थापक   रोहित शेलटकर म्हणाले, ग्रँड मराठा फाऊंडेशन नेहमीच उत्तमोत्तम सुविधा आणि शिक्षणाच्या माध्यमातून वंचितांचा सर्वसमावेशक विकास आणि त्यांचा उत्कर्ष करण्यास निरंतर वचनबद्ध आहे. शक्य तितक्या कुटुंबांची दिवाळी अधिक उत्साहाची, आनंदाची करण्यासाठी आणि त्यांच्यावर चेहर्‍यावर हसू फुलवण्यासाठी आम्ही त्यांना साह्य करू शकतो, याचा आम्हाला आनंद आहे. शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना अधिक चांगले आयुष्य मिळावे यासाठी त्यांना सक्षम करण्याचे आमचे प्रयत्न अविरत सुरू राहतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments