Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्र...तर शिवसेना, काँग्रेस महाआघाडी पर्यायी सरकार देतील : नवाब मलिक

…तर शिवसेना, काँग्रेस महाआघाडी पर्यायी सरकार देतील : नवाब मलिक

nawab malik NCP support for Shiv Sena to power
मुंबई : सत्ता स्थापनेच्या पेचप्रसंगवार बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी मोठं विधानं केलं. शिवसेनेची तयारी असल्यास राज्याला आम्ही पर्यायी सरकार देण्याबाबत विचार करू. असं मलिक यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.

नवाब मलिक यांनी सांगितलं की, राज्यावर राष्ट्रपती राजवट लागू होऊ देणार नाही. राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून तेरा दिवस उलटले तरी सत्तास्थापनेचा तिढा मात्र सुटलेला नाही. शिवसेना आणि भाजपा दोन्ही पक्ष आपल्या मागण्यांवर ठाम असून नवाब मलिकांच्या नव्या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दोन-तीन दिवसांमध्ये राज्यात सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आम्ही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ देणार नाही. शिवसेनेनं विचारणा केल्यास आम्हीदेखील सत्ता स्थापनेसाठी हात पुढे करू, त्यामुळे राज्यात पर्यायी सरकार स्थापन होईल, अस मलिक यावेळी म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments