Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रथंडीने राज्य गारठले!

थंडीने राज्य गारठले!

महत्वाचे…
१.थंडीची लाट दोन दिवस कायम राहणार २. मुंबईत दिवसाही गार वारे वाहात ३. काही भागात पारा सरासरीपेक्षा खाली जाण्याची शक्यता


मुंबई: मुंबईसह राज्यात थंडीची लाट पसरली. नाशिक पुणे आणि नागपूर या महत्त्वाच्या शहरांना थंडीने हुडहुडी भरली आहे. मुंबईकर अक्षरश: कुडकुडले आहेत. दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार आहेत.

विशेष म्हणजे, मुंबईत दिवसाही गार वारे वाहात असल्याने, मुंबईकर खऱ्या अर्थाने हिवाळा अनुभवत आहेत. नाशिक नागपूर,पुणे  या तिन्ही शहरांमध्ये पारा १० अंशाच्या खाली घसरला.  राज्यात येत्या काही दिवसात थंडी वाढणार असून, राज्यात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या काही भागात पारा सरासरीपेक्षा खाली जाण्याची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेनं हा अंदाज वर्तवला आहे. उत्तर भारतातून थंड हवा महाराष्ट्राच्या दिशेनं येत आहे. त्यामुळे थंडी जास्त पडत असल्याचं कुलाबा वेधशाळेनं सांगितलं आहे. त्यामुळे  राज्यातील लोकांना अजून काही दिवस तरी  या थंडीचा कडाका सहन करावा लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments