Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रकर्जमाफीच्या आकडेवारीबाबत सरकारच गोंधळलेले-विखे पाटील

कर्जमाफीच्या आकडेवारीबाबत सरकारच गोंधळलेले-विखे पाटील

मुंबई: सरकारच्या करणी आणि कथणीमध्ये मोठ्या प्रमाणात फरक असल्यामुळेच कर्जमाफीच्या योजनेबाबत स्पष्ट माहीती सरकार देवू शकत नाही. कर्जमाफी योजनेच्या आकडेवारीबाबत सरकारच आता गोंधळलेले आहे. पोर्टलवर शेतकरी कर्जमाफीची यादी जाहीर करण्याची या सरकारची घोषणासुध्दा फसवीच ठरली आहे. सरकारच्या कर्जमाफी योजनेचा कोणताही लाभ शेतक-यांना होत नसल्याच आम्ही सातत्याने करीत असलेल्या आरोपाला एकप्रकारे आता पुष्टीच मिळत असल्याची प्रतिक्रीया विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण  विखे पाटील यांनी व्यक्त‍ केली.

संगमनेर येथे पत्रकारांशी बोलताना विखे पाटील यांनी सांगितले की, सरकार जर ८९ लाख शेतक-यांना कर्जमाफ होणार असे सांगत होतेतर, हा आकडा ३४ लाखांवर कसा आला? ३५ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची वल्गना सरकार करत होते, मग हा १८ हजार कोटींचा आकडा कुठून आला. याकडे लक्ष वेधून विखे पाटील म्हणाले की, सरकार कर्जमाफीच्या  आकडेवारीबाबत सभागृहात माही‍ती देवू शकले नाही,ते माहीती आधिकारात माहीती देणार तरी कसली असे स्पष्ट करुन विरोधी पक्षनेते म्हणाले की, कर्जमाफी योजनेत कर्जमाफी झालेल्या शेतक-यांची यादी पोर्टलवर टाकण्याची घोषणाही हे सरकार विसरले असल्याची टीका त्यांनी केली.

कर्जमाफी योजनेचे या सरकारने केवळ भांडवल केले. प्रत्यषक्षात मात्र योजनेची अंमलबजावणी शेवटच्या शेतक-यापर्यंत झालेली नाही. गेल्या अनेक दिवसांपासून सरकारला आम्ही याच प्रश्नाचा जाब विचारत आहोत पण सरकारच्या करणी आणि कथनीमध्ये मोठा फरक आहे. कर्जमाफी योजना हे त्याचे उत्तर उदाहरण आहे. कर्जमाफी योजनेत लाभ झालेल्या शेतक-यांची माहीती आणि आकडेवारी सरकारकडे उपलब्ध आहे तर,जिल्हास्तरावर ही माहीती उपलब्ध करुन देण्यावत काय अडचण आहे असा सवालही विखे पाटील यांनी उपस्थित केला.

शिवसेनेच्या मंत्र्यांनी जी तत्पवरता नगरच्या घटनेबाबत दाखविली तीच तत्परता शिवसेना शेतक-यांच्या कर्जमाफीवर का दाखवत नाही?कमला मील आणि मुंबईतील ईमारत कोसळण्या-च्या घडलेल्या घटनांबाबत शिवसेनेची तत्परता कुठे गेली होती, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

नगर जिल्ह्याच्या विभाजनासंदर्भात बोलताना विखे पाटील म्हणाले की, नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे या मताची मी आहे. फक्त मुख्यालय कोणते हवे यावर एकमत होत नसल्यामुळे जिल्ह्याचे विभाजन लांबले आहे. संगमनेर जिल्हा व्हावा अशी मागणी कृती समितीच्या सदस्यांची आहे. त्यांची बाजू शासनापर्यंत पोहचविण्यासाठी माझा प्रयत्न आहे. यासाठीच कृती समितीने सुरु केलेल्या आंदोलनाला मी आज भेट दिली. कृती समितीच्या सदस्यांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणण्यालची ग्वाही विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्र्यांशी असलेल्या मैत्रीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विखे पाटील म्हणाले की, आमच्या दोघांच्या मैत्रीबाबत विनाकारण अनेकांना उत्सुकता असते. सरकारवर अंकुश ठेवताना विकासाच्या, गोष्टीत प्रत्येक वेळी राजकारण म्हणून भूमिका बजावणे हे अयोग्य असते. निळवंडे कालव्यांना निधी मिळवतांना मैत्रीचाच फायदा झाला. जिल्ह्याचे विभाजन करण्याठसाठीही मैत्रीचाच उपयोग होईल. फक्त विभाजन झाल्यावर आमचे अभिनंदन करण्याचा विसर आमच्या मित्रांना पडू नये असा टोला विखे पाटील यांनी आ.थोरातांचे नाव न घेता लगावला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments