Sunday, May 26, 2024
Homeविदर्भनागपूरपोटच्या मुलीनेच नवऱ्याच्या मदतीने बापाला मारलं !

पोटच्या मुलीनेच नवऱ्याच्या मदतीने बापाला मारलं !

नागपूर: नागपूरमध्ये बॅगमध्ये मृतदेह सापडलेल्या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. प्रॉपर्टीच्या वादातून पोटच्या मुलीनेच आपल्या पतीच्या मदतीने वडिलांची हत्या केल्याचं समोर आलंय.

नागपूर शहरात एका बॅगमध्ये मृतदेह आढळल्याची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. आता या प्रकरणाचे एक-एक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॅगमध्ये सापडलेल्या पुरुषाचा मुली आणि जावयानेच खून केल्याचं उघड झालंय. किरण शिव असं या मुलीचे नाव असून तिला साथ देणाऱ्या तिच्या नवऱ्याचे नाव विजय तिवारी आहे हे दोघेही घटनेपासून फरार आहेत. तर खून झालेल्या व्यक्तीचे नाव मानसिंग शिव असे आहे.

काय घडलं ?

रविवारी मध्यरात्री दुर्गा स्टँडवरून तरुण-तरुणींनी रिक्षा पकडली. त्यांनी रिक्षाचालक  विनोद सोनडवले याला रेल्वे स्टेशनकडे जाण्याचं सांगितलं. पण तरुण-तरुणीचं बॅगसह सोनडवलेंना यांचं वर्तन संशयास्पद वाटलं. एवढंच नाहीतर बॅगमधून दुर्गंधी येत असल्यामुळे त्यांनी त्यांना विचारणा केली.  थोडे पुढे जाताच दोघांनी बॅग रिक्षातच ठेवून पोबारा केला.

रिक्षाचालकाने तातडीने पोलिसांकडे धाव घेतली आणि पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी वेगाने सूत्र फिरवली आहे. जी माहितीसमोर आली त्याने पोलिसांनाही धक्का बसला. ज्या पुरुषाचा मृतदेह सापडला होता त्याच्याच मुलीने आपल्या पतीचे मदतीने संपवलं होतं.

सायकल दुरुस्तीचे काम करणारे मानसिंग शिव यांचे नागपूरच्या प्रतापनगरात दोन खोल्याचे घर आहे. बुलडाण्यात हाॅटेल चालवणारा विजय तिवारी आणि मानसिंग यांची मुलगी किरण यांचे तीन वर्षांपुर्वी लग्न झाले त्यांना दोन वर्षांचा मुलगाही आहे. गेल्या सहा महिन्यांपासून किरण ही नागपुरात वडिलांकडे राहत होती. सासऱ्यांकडे वारंवार येणाऱ्या विजयने हे घऱ आपल्याला देण्याची मागणी अनेकदा केली होती. पण आधीच गरिब असणारे आणि सायकल दुरुस्तीचे काम करणारे मानसिंग यांना घर देणं शक्य नसल्यानं त्यांनी विजयला नकार दिला. पण किरण आणि विजय या दोघांनी मिळून मानसिंग यांचा खून केला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो सुटकेसमध्ये भरून तो ऑटोरिक्षामध्ये भरून रेल्वे स्टेशनकडे नेण्याचं ठरवलं.

मुलगी आणि जावयी फरार

किरण शिव आणि तिचा पती विजय तिवारी असं या दोघांचं नाव आहे. हे दोघेही प्रतापनगरमध्ये राहतात.  किरण शिव आणि तिचा पती विजय तिवारी फरार आहे. या प्रकरणात प्रॉपर्टीच्या वादातून आपल्या वडिलांचा खून केल्याच पोलिसांना संशय आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments