मुंबई : मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की… असं म्हणून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ आज उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्क मैदानावर घेतली. शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांचा शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांनी ही शपथ उद्धव ठाकरेंना दिली.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंनी सरकार स्थापन केलं. त्यानंतर जमलेल्या सगळ्या उपस्थितांना उद्धव ठाकरेंनी दंडवतही घातला. शिवसेनेकडून विधीमंडळाचे नेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधीमंडळाचे नेते जयंत पाटील, काँग्रेसतर्फे काँग्रेसचे विधीमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.