Sunday, January 26, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात ‘स्वाभिमान’चे आंदोलन!

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात ‘स्वाभिमान’चे आंदोलन!

मुंबई-महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने सिंधुदुर्गात मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेच्या प्रश्नावर ‘लिंबू-मिरची’ आंदोलन केले आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसमधुन बाहेर पडत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील प्रत्येक गाडीला लिंबू मिरच्या बांधल्या. ‘चांदा ते बांदा, सुरक्षित प्रवासासाठी लिंबू मिरची बांधा’, अशा घोषणा देत राणेंच्या कार्यकर्त्यांनी गाड्यांना लिंबू-मिरच्या बांधल्या आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचा निषेध केला. आठ ते दहा दिवसात मुंबई गोवा महामार्ग सुस्थितीत झाला नाही, तर महामार्ग चक्का जाम करु, असा इशाराही पक्षाने दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments