इंदापूर: राज्य सरकारने कर्जमाफीची वेळेत अंमलबजावणी केली नाही तर हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही, असा सज्जड इशाराच अजित पवारांनी भाजपला दिलाय. भाजपविरोधात सत्ताधारी शिवसेनेनंही विरोधकांसोबत यावं. असं खुलं आवाहनच अजित पवारांनी शिवसेनेच्या आमदारांना केलंय.
”कर्जमाफीच्या मुद्द्यावर हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं एकत्र यावं, मग बघू अधिवेशन कसं चालतं ते, ” असं अजितदादा 3 शिवसेना आमदारांसमोरच म्हणाले. स्वार्थी मित्रापेक्षा दिलदार विरोधक परवडला, असं मुख्यमंत्री नुकतंच म्हणाले होते.. त्यालाही अजितदादांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. कर्जमाफीच्या ऑनलाईन घोळामुळे डिसेंबरपर्यंत कर्जमाफी होणारच नसल्याचा दावाही अजित पवारांनी केलाय.