मुंबई । मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी सकाळी इसिसच्या एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. अबू जाहिद असे या त्याचे नाव असून तो सौदी अरेबियातून भारतात परतताच त्याला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील दहशतवादविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.
अबू इसिससाठी काम करत असून रविवारी सकाळी तो सौदी अरेबियातून भारताला येणार आहे. अशी माहिती उत्तर-प्रदेशच्या एटीएस पथकाला मिळाली होती. यामुळे पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला होता. अबूचे विमान विमातळावर येताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. त्यानंतर अबूला घेऊन पोलिसांचे पथक लखनौला रवाना झाले आहे. दुबईतून तो इसिसला पैसे पुरवण्याचे काम करत होता. काही दिवसांपूर्वी केरळ, सुरतमधून इसिसच्या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.