Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्र२०१७ला निरोप देण्यासाठी तिन्ही मार्गावर विशेष लोकल

२०१७ला निरोप देण्यासाठी तिन्ही मार्गावर विशेष लोकल

मुंबई: २०१७ ला निरोप देण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या लोकांसाठी रेल्वे प्रशासनानं गुडबाय गिफ्टदिलं आहे. नवीन वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी अनेक लोक बाहेर पडतात. त्यांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेनं ८ आणि मध्य रेल्वेनं ४ विशेष फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. नवीनवर्षाचा जल्लोष साजरा करणाऱ्यांचा टेंन्शन दूर झाले आहेत.

विशेष रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक

विरारहून सुटणाऱ्या गाड्या

रात्री १२.१५ वा.ची लोकल चर्चगेटला रात्री १.४७ वा. पोहोचेल.

रात्री १२.४५ वा.ची लोकल चर्चगेटला रात्री २.१७ वा. पोहोचेल.

रात्री १.४० वा.ची लोकल चर्चगेटला पहाटे ३.१२ वा. पोहोचेल.

पहाटे ३.०५ वा.ची लोकल चर्चगेटला पहाटे ४.३७ वा. पोहोचेल.

चर्चगेटहून सुटणाऱ्या गाड्या

रात्री १.१५ वा.ची लोकल विरारला पहाटे २.५५ वा. पोहोचेल.

रात्री २ वा.ची लोकल विरारला पहाटे ३.४० वा. पोहोचेल.

रात्री २.३० वा.ची लोकल विरारला पहाटे ४.१० वा. पोहोचेल.

पहाटे ३.२५ वा.ची लोकल विरारला पहाटे ५.०५ वा. पोहोचेल.

मध्य रेल्वेच्या गाड्या

सीएसएमटीहून रात्री १.३० वा.ची लोकल कल्याणला पहाटे ३ वाजता पोहोचेल.

कल्याणहून रात्री १.३० वा.ची लोकल सीएसएमटीला पहाटे ३ वाजता पोहोचेल.

हार्बरवरील गाड्या

सीएसएमटीहून रात्री १.३० वा.ची लोकल पनवेलला पहाटे २.५० वा. पोहोचेल.

पनवेलहून रात्री १.३० वा. ची लोकल सीएसएमटीला रात्री २.५० वा. पोहोचेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments