Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपच्या वेबसाईटवर रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख;गृहमंत्र्यांच्या तंबीनंतर बदल

भाजपच्या वेबसाईटवर रक्षा खडसे यांचा आक्षेपार्ह उल्लेख;गृहमंत्र्यांच्या तंबीनंतर बदल

मुंबई: राज्यातील प्रमुखविरोधी पक्ष असणाऱ्या भाजपाच्या अधिकृत वेबासाईटवरील एक गंभीर सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत आहे. रावेर विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांची पक्षाच्या वेबसाईटवरच चुकीची ओळख सांगत वादग्रस्त शब्दांमध्ये उल्लेख करण्यात आल्याचे स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणावर आता थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली असून कारवाईचा इशारा दिला आहे.

“भाजपाच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे जी यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही.  भाजपा आपण दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर सेल पुढील कारवाई करेल,” असं देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

भाजपाच्या अधिकृत वेबसाईटवर पक्षाच्या देशभरातील खासदारांची माहिती आहे. यामध्ये खासदाराचे नाव, फोटो आणि मतदारसंघाचा उल्लेख आहे. मात्र रक्षा खडसे यांच्या मतदारसंघाचा म्हणजेच रावेरचा उल्लेख करण्याऐवजी या वेबसाईटवर ‘होमोसेक्शुअल’ असं लिहिण्यात आल्याचा दावा करणारा स्क्रीनशॉट सगळीकडे व्हायरल झालाय.

हा स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाल्यानंतर आता तरी रक्षा खडसे यांच्या फोटोखालील हा उल्लेख काढून तेथे मतदारसंघाचं नाव टाकून चूक सुधारण्यात आल्याचे दिसत आहे. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार (Raver) रावेरचं हिंदीमधील गुगल ट्रान्सलेशन चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्यानं हा गोंधळ झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यासंदर्भात अद्याप भाजापाने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments