Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeकोंकणठाणेशिवसेनेत महिला नगरसेविका अपमानित, नगरसेविकेचा राजीनामा

शिवसेनेत महिला नगरसेविका अपमानित, नगरसेविकेचा राजीनामा

कल्याण डोंबिवली पालिकेची महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यामध्ये सेनेच्या ज्येष्ठ नगरसेविकेकडून आपल्याला अर्वाच्च भाषेत आणि जातीवाचक शब्दात शिवीगाळ केल्याचा आरोप तारे यांनी आपल्या राजीनामापत्रात केला आहे. तसेच आपल्यासारख्या अनेक नव्याने निवडून आलेल्या नगरसेविकांना या ज्येष्ठ नगरसेविकेकडून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचेही या पत्रात नमुद करण्यात आले आहे. या वागणुकीविरोधात आपण आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा देत असल्याचे तारे यांनी म्हटले आहे. मात्र ही ज्येष्ठ नगरसेविका नेमकी कोण याचा राजीनामापत्रात नामोल्लेख करण्यात आलेला नाही. मनिषा तारे यांनी महापौर, सभागृह नेते आणि गटनेते यांना हे पत्र पाठवले आहे. यासंदर्भात तारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र अद्याप तो होऊ शकलेला नाही. विशेष बाब म्हणजे एखाद्या लोकप्रतिनिधीला राजीनामा द्यायचा झाल्यास त्याने महापालिका आयुक्तांकडे तो सोपवणे आवश्यक आहे. मात्र मनिषा तारे यांनी आयुक्तांऐवजी महापौर आणि इतर पदाधिकाऱ्यांकडे आपला राजीनामा दिल्याने त्यांच्या भूमिकेबाबत साशंकता निर्माण होत आहे.

दरम्यान नवनिर्वाचित महापौर वनिता राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यावेळी पालकमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे आले होते. यांना सभागृहात घडलेल्या दोन महिला नगरसेवकांमध्ये वादावादी प्रकरणाबद्दल विचारले असता शिवसेनेत जातीभेद नसतो, महिला खुला वर्गाचे आरक्षण असल्याने त्यांना हे पद मिळाले. अंतर्गत कोणताही वाद नाही. असे मत त्यांनी त्यावेळी व्यक्त केले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments