Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रकोंकणपालघरमध्ये राणे विरुद्ध शिवसेना

पालघरमध्ये राणे विरुद्ध शिवसेना

मुंबई: महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते असलेल्या नारायण राणे यांना भाजपने राज्यसभेची खासदारकी दिली आहे. राणे आणि शिवसेना यांचं वैर सर्वश्रृत आहे. खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच भाजप राणेंना शिवसेनेविरुद्ध भिडवणार आहे. पालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेविरोधात प्रचारासाठी भाजपनं खासदार नारायण राणे यांना पाचारण केलं आहे. राणेंना प्रचार करण्याची विनंती चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देत राणेही प्रचाराला जाणार असल्याचं कळतंय.

चिंतामणराव वनगा यांच्या निधनानंतर पालघर लोकसभेची जागा रिक्त झाली होती. त्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडत वनगा कुटुंबियांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेने चिमामण वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली आहे.

तर भाजपने काँग्रेसमधून आयात केलेले राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून दामोदर शिंगडा यांनी उमेदवारी दाखल केली आहे.

पालघरच्या लढतीकडं सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यामुळं राणेंना प्रचाराच्या मैदानात उतरवून भाजपनं नवी खेळी खेळली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments