Placeholder canvas
Tuesday, April 16, 2024
Homeमहाराष्ट्रम्हणे…शरद पवारांनी ‘केंद्रालाही लुटले’ सारा तेंडुलकरच्या अकाऊंटवरुन टीका

म्हणे…शरद पवारांनी ‘केंद्रालाही लुटले’ सारा तेंडुलकरच्या अकाऊंटवरुन टीका

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कन्या साराच्या नावानं ट्विटरवर फेक अकाऊंट तयार करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या अकाऊंटवरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

‘शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्राला लुटण्याचा प्रयत्न केला, हे सगळ्यांनाच माहित आहे. पण त्यांनी केंद्रालाही लुटायचा प्रयत्न केला, हे फारसं जगजाहीर नाही’ असं ट्वीट या अकाऊंटवरुन 9 ऑक्टोबर रोजी करण्यात आलं होतं. विजय मल्ल्याने शरद पवारांचं नाव घेतल्याच्या चर्चांवरुन हे ट्वीट करण्यात आल्याचा अंदाज आहे.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन याबाबत सचिन तेंडुलकरला माहिती दिली आहे. हे फेक अकाऊंट कोणाचं आहे, ते शोधून तक्रार करावी, असंही आव्हाडांनी सांगितलं आहे. फेक अकाऊंटवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही आव्हाडांनी दिला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीसोबतच काँग्रेस, राहुल गांधी, शिवसेना, सीताराम येचुरी अशा अनेकांवरही टीका करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments