skip to content
Friday, May 24, 2024
Homeमहाराष्ट्रखराब रस्त्यांमुळे आज उल्हासनगरमध्ये 'रिक्षा बंद'

खराब रस्त्यांमुळे आज उल्हासनगरमध्ये ‘रिक्षा बंद’

उल्हासनगर:   कल्याणजवळच्या उल्हासनगरमधले रिक्षाचालक आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. पण यावेळी भाडेवाढ व्हावी म्हणून नाही तर शहरातील खराब रस्त्यांना कंटाळून ते संपावर गेले आहेत.

उल्हासनगरमधल्या ३ रिक्षा युनियन एकत्र आल्या आहेत. शहरातील खराब रस्त्यांमुळे पालिकेचा निषेध करण्यासाठी  संपावर गेले आहेत.रस्त्यांवरील खड्ड्यांना वैतागून आज उल्हासनागरमधील शहीद रमाकांत चव्हाण चालक-मालक रिक्शा यूनियन, शहीद मारोतीराव जाधव आणि रिपब्लिकन चालक मालक रिक्शा यूनियन अशा तीनही संघटनानी एकत्रित येऊन आजपासून बेमुदत रिक्शा बंद पुकारला आहे.

गणपती उत्सवाच्या आधीपासून राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि रिक्शा यूनियन सातत्याने रस्त्याना असलेल्या खड्डया बाबत पालिका प्रशासनाला विनवणी करत होते.  मात्र आज रिक्शा संघटनांचा संयम सुटला आणि त्यानी बंदची  हाक दिली आहे.  गणेशोत्साच्या आधीपासून फक्त रिक्षाचालकच नाही तर नागरिकही रस्ते सुधारण्याची मागणी करत आहेत. पण प्रशासन उदासीन असल्यामुळे चांगलीच नाराजी पसरलीय. सामान्य प्रवाशांचे मात्र यामुळे हाल होत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments