नांदेड – शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या राजीनाम्यासाठी शिवसैनिकांनी त्यांच्या निवासस्थानासमोर ‘ढोल बजाओ आंदोलन’ केलं. प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या राजीनाम्यासाठी शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील यांनी नांदेड महापालिका निवडणुकीत भाजपाला उघडपणे साथ दिली होती. या निवडणुकीत शिवसेनेला केवळ एकाच जागेवर विजय मिळाला होता. यालाच विरोध करत शिवसैनिकांनी त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोमवारी (६ नोव्हेंबर) ढोल बजाओ आंदोलन केले.
यावेळी भाजपा आणि शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने आले व एकमेकांविरोधात प्रचंड नारेबाजी करण्यात आली. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. शिवाय, पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यातही घेतले.