मुंबई : गुरुवारी महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांचा निकाल लागणार आहे. यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी झाली आहे. मतमोजणीला गुरुवारी सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. काही तासांवर निकाल येऊन ठेपल्यामुळे उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे.
संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान भारत निवडणूक आयोगाचे निरीक्षक (ऑब्झर्वर) उपस्थित राहणार आहे. फेरी निहाय मतमोजणीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करतील. सर्वसामान्यांना मतमोजणीची माहिती मिळावी यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर ध्वनिक्षेपक लावण्यात आले आहेत.
भारत निवडणूक आयोगाच्या eciresults.nic.in या संकेतस्थळावर मतदारसंघाचे फेरीनिहाय निकाल, संपूर्ण राज्यातील पक्षनिहाय आघाडीवरील उमेदवार, विजयी उमेदवार, पक्षनिहाय मतदानाची टक्केवारी आदी माहितीदेखील उपलब्ध होणार आहे.