Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रराज ठाकरे आज पदाधिका-यांना देणार कानमंत्र

राज ठाकरे आज पदाधिका-यांना देणार कानमंत्र

raj thackeray mns assembly electionमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभेत सपाटून मार खाल्ला. शंभरपेक्षा जास्त उमेदवार देऊनही फक्त कल्याण ग्रामीणमध्ये एकच आमदार निवडूण आला. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मंगळवारी पदाधिका-यांनी दुपारी दोन वाजता बैठक बोलावली आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरेंच्या उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि उपाध्यक्षांची बैठक होणार आहेत. पक्षामध्ये आलेली मरगळ, विधानसभेत झालेला दारून पराभव आणि नवीन पक्ष बांधणी, सदस्य नोंदणी तसेच येणा-या मुंबई महापालिका निवडणूक यासह अनेक विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. यामुळे पक्षाची ही बैठक महत्वाची मानली जात आहे.

राज ठाकरेंनी विधानसभेत भाजप विरोधात कोणतीही आक्रमक भूमिका मांडली नव्हती. ईडीच्या नोटीशीनंतर राज ठाकरेंचा आक्रमकपणा कमी झाला असल्याचे दिसून आला. त्यामुळे पक्षात भविष्यवाढीसाठी राज ठाकरे पदाधिका-यांना काय कानमंत्र देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments