Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रराज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे वाचला डोंबिवलीतील समस्यांचा पाढा!

राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे वाचला डोंबिवलीतील समस्यांचा पाढा!

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. डोंबिवलीच्या विकासासाठी येणाऱ्या अडथळ्यांचा पाढा वाचला. राज ठाकरे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं आधीच जाहीर करण्यात आलं होत. ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये अजून काही चर्चा झाली का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आज दुपारी राज ठाकरे मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यावर पोचले. त्यानंतर जवळपास एक सव्वा तास त्यांच्यात चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षावर बैठक झाली. गिरीष महाजनही या बैठकीला उपस्थित होते. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी बोलतांना डोंबिवलीच्या विकासासंदर्भात त्यांच्यात बैठक झाली असे सांगितले. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे डोंबिवलीच्या दौऱ्यावर होते. त्यांनी कल्याण-डोंबिवलीच्या आयुक्तांचीही भेट घेतली होती. तसंच राज्यात स्टार्ट अप इंडियाची पॉलिसी ठरलेली नाही , तरुण उद्योजकांना संधी मिळालेली नाही , डोंबिवलीत जुन्या इमारतींचा प्रश्न सोडवा या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी नागरिकांना फेरीवाल्यांचा त्रास होत असल्याचा मुद्दा राज ठाकरे यांनी उचलून धरला आहे. यातच काँग्रेसचे संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांची बाजू घेत या वादात उडी घेतल्याने हा प्रश्न चिघळला आहे. याच मुद्यावर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असल्याचे संगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीचा दौरा केला होता. त्या दौऱ्यादरम्यान डोंबिवलीच्या काही ज्येष्ठ नागरिकांनी, वास्तू विशारदांनी जिल्हाधिकारी मालकीच्या जमिनीचा मुद्दा उपस्थित केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments