Friday, July 19, 2024
Homeदेशदहशतवादी कृत्यात हिंदू कट्टरपंथीयांचा सहभाग- कमल हसन

दहशतवादी कृत्यात हिंदू कट्टरपंथीयांचा सहभाग- कमल हसन

नवी दिल्ली |  अभिनयानंतर आता राजकारणात प्रवेश करत असलेल्या कमल हसन यांनी ‘हिंदू दहशतवादा’वरून नवा वाद छेडला आहे. उजव्या विचारसरणीने आता ‘मसल पावर’चा वापर करण्यास सुरूवात केली आहे. हिंसाचारात त्यांचा सहभाग असून, हिंदू शिबिरांमध्ये आता दहशतवाद घुसला असल्याची टीका त्यांनी तामिळ साप्ताहिक ‘आनंदा विकटन’मध्ये लिहिलेल्या लेखातून केली.

पूर्वीचे कट्टर हिंदू चर्चा करण्यावर विश्वास ठेवत. पण आता ते हिंसेत सहभागी होतात, असे म्हणत लोकांचा सत्यमेव जयतेवरील विश्वास उडत चालला असल्याचे त्यांनी आपल्या लेखात लिहिले. कमल हसन यांनी केरळ सरकारचे कौतुकही केले. केरळने तामिळनाडूपेक्षाही चांगल्या पद्धतीने धार्मिक हिंसाचाराचा प्रश्न हाताळल्याचे ते म्हणाले.

कमल हसन यांच्या या लेखामुळे हिंदू दहशतवादावरून पुन्हा एकदा नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी याप्रकरणी टीका करत हसन हे स्वत: नैतिकदृष्ट्या भ्रष्ट असल्याचे म्हटले. ‘हिंदू दहशतवादा’चे काही पुरावे नसल्याचेही स्वामी म्हणाले.

कमल हसन यांचा सात नोव्हेंबरला वाढदिवस आहे. त्यांचे चाहते या दिवसाची प्रतिक्षा करत आहेत. यावेळी ते राजकारणात येण्याचा निर्णय घेऊ शकतात. यापूर्वीही हसन हे राजकारणात येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यांनी या साप्ताहिकातील एका लेखाला ‘तयार राहा.. सर्व काही सात नाव्हेंबरला सांगेन’ असे सूचक शीर्षक दिले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments