Friday, December 6, 2024
Homeमहाराष्ट्र…तर उद्या प्रत्येकाच्या घराबाहेर अशा गाड्या उभ्या राहतील : राज ठाकरे

…तर उद्या प्रत्येकाच्या घराबाहेर अशा गाड्या उभ्या राहतील : राज ठाकरे

raj-thackeray-reaction-on-parambir-singh-letter-to-uddhav-thackeray-news-updates
raj-thackeray-reaction-on-parambir-singh-letter-to-uddhav-thackeray-news-updates

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळून आलेल्या स्फोटकांच्या गाडीच्या मुद्दा गाजत असताना मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून बदली करण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी धक्कादायक आणि खळबळजनक गौप्यस्फोट केला. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याला १०० कोटी वसूल करून देण्याची मागणी केली होती, असं सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं असून, या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्यात राजकीय भूंकप आला आहे. सिंग यांनी केलेले आरोप आणि अनिल देशमुख यांच्याबद्दल बोलताना राज ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी केंद्र सरकारने करावी अशी मागणी केली. “”आपण मूळ विषय विसरत आहोत. सुशांत सिंग प्रकरण बाजूला राहिले आणि लोक मूळ विषय विसरून जातो.

मुळात मुकेश अंबानींच्या घराजवळ बॉम्बची गाडी ठेवली गेली हा मूळ विषय आहे, तो विषय मागे पडला आहे? त्या गाडीत सापडलेलं जिलेटीन कुठून आलं? याची उत्तरं अजून का नाही मिळाली? आणि त्यांच्या घराबाहेर बॉम्ब सापडतात आणि ती गाडी पोलिसानी ठेवली असा आरोप आहे, मुळात अशी घटना कोणीतरी वरिष्ठांच्या सांगण्याशिवाय होऊ शकतं का? ही गाडी कोणाच्या सांगण्यावरून ठेवली गेली याचा तपास करण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा. केंद्राकडून या गोष्टीचा तपास व्हायला हवा. याचा तपास झाला, तर धक्के बसतील असे चेहरे समोर येतील,” असा गौप्यस्फोट राज यांनी केला आहे.

“सरकार बरखास्त करा, राष्ट्रपती राजवट लागू करा, हे राजकीय मुद्दे आहेत. यात आत्ता नको पडायला. याची चौकशी व्यवस्थित होऊ द्या. कारण चौकशी व्यवस्थित झाली नाही, तर उद्या प्रत्येकाच्या घराबाहेर अशा गाड्या उभ्या राहतील. पोलिसांना हे कृत्य करायला लावणारे कोण हे आधी कळू द्या. अंबानींच्या घराजवळ बॉम्बची गाडी ठेवण्यात आली. आजपर्यंत मी काय सगळेच असा विचार करत होतो की, बॉम्ब अतिरेकी ठेवतात. पण, बॉम्ब पोलीस ठेवतात, असं आपण कधी ऐकलेलं नाही. यात वाझेंना अटक झाली. त्यांची चौकशी सुरू आहे.

 परमबीर सिंग यांना त्यांच्या पदावरून का हटवलं. त्यांची बदली का केली गेली हे अजून सरकारने सांगितलेलं नाही. सिंग यांचा काही संबंध होता का? त्यांचा त्यात सहभाग होता का? त्यांना त्या पदावरून बाजूला का केलं गेलं. जर त्यांचा सहभाग होता, तर मग त्यांची चौकशी का केली नाही, त्यांची बदली का केली गेली? सरकारने अंगावर आलेली गोष्ट दुसऱ्याच्या खांद्यावर टाकली,” अशी टीका राज यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments