Saturday, October 12, 2024
Homeमहाराष्ट्रमनसेत अंतर्गत फेरबदल करणार- राज ठाकरे

मनसेत अंतर्गत फेरबदल करणार- राज ठाकरे

मुंबई : मनसे मध्ये अकार्यक्ष पदाधिकऱ्यांना नारळ देऊन, अंतर्गत फेरबदल करण्याचे संकेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज डोंबिवली येथे दिले. महापालिकेतील मनसेचे सात नगरसेवकांपैकी सहा नगरसेवक शिवसेनेत गेल्यानं झालेल्या हानीची पुनरावृत्ती कल्याण डोंबिवलीत होऊ नये यासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करणार करण्यासाठी आज डोंबिवलीत पोहोचलेत.

डोंबिवली जिमखान्यात सकाळी साडे ऩऊच्या सुमारास राज ठाकरेंचं आगमन झालं. आज दिवसभर राज ठाकरे शहरातली नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. संध्याकाळी राज ठाकरे पत्रकार परिषदही घेण्याची शक्यता आहे.  कल्याण डोंबिवलीत मनसेचे ९ नगरसेवक आहेत. तर एक नगरसेवक मनसेच्या पाठिंब्यावर निवडून आलाय. त्यामुळे मनसेकडे सध्या १० नगरसेवक आहेत. मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या नगरसेवकांची कल्याण-डोंबिवली फोडाफोडी होण्याची शक्यता बघता. पक्षाची एकजूट कायम ठेवण्याच्या दृष्टीनं राज ठाकरेंचा दौरा महत्वाचा मानला जातोय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments